धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय, समता आणि प्रगतिशील विचारांचा वारसा जपणारे कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 6 मे रोजी स्मृतीदिन धाराशिवमध्ये श्रद्धापूर्वक पाळण्यात आला. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर घडविणाऱ्या या महान राजर्षींना नागरिकांनी त्रिवार मुजरा केला.

येथील शाहू महाराज चौकात त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सुनील आंबेकर, रोहित पडवळ, माजी नगरसेवक खलील, माजी नगरसेवक कुणाल निंबाळकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष मोहन मुंडे, नगरसेवक नरसिंह मिटकरी, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आकाश मुंडे, गणेश साळुंखे, प्रजय पवार, सर्फराज कुरेशी, बाळासाहेब गाडेकर, प्रशांत सावंत, शहानवाज सय्यद, ओम नाईकवाडी, वाजिद सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.


 
Top