लोहारा/प्रतिनिधी
महसूल विभागात सेवा करत असताना कितीही दबाव आला तरी अधिकारी, कर्मचा-यांनी सकारात्मक मानसिकतेतून काम करत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.1 ऑगस्ट 2019 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ सेवा बजावणा-या कर्मचा-यांचा व महसुल अधिकारी व कर्मचा-यांच्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख म्हणुन पुणे आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे, उपविभागिय अधिकारी विठ्ठल उदमले, चारुशिला देशमुख, प्रताप काळे, शिरीष यादव, संतोष राऊत, महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, तहसिलदार विजय अवधाने (लोहारा), तहसीलदार संजय पवार (उमरगा), अदि, उपस्थित होते. यावेळी वर्षभर उत्कष्ठ काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा व स्वराज्यांचा मुलमंत्र देणारे लोकमान्य टिळक याची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे याच्या जयंती तसेच महसुल दिनानिमित्त सत्कार व प्रतिमिचे पुजन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, की प्रत्येक कामामध्ये लोकसहभाग अवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय काम यशस्वी होत नाही. त्यामुळे लोकसहभाग वाढवून विकासाची वाट धरण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा. पासाअभावी शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांना पशुसंवर्धनाकडे वळावण्यासाठी तलाठयांनी गावा गावात जनजागृती करावी, असे सांगीतले. यावेळी महसूल पुरस्कार मुर्ती उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले (उमरगा,लोहारा), एम. एस.स्वामी, ए.पी. गायकवाड, माधव मैंदपवाड, अदि अधिकारी व कर्मचा-यांचा व महसुल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सन्मान जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करुन वृक्ष लागवड करण्यात आले. या शिबीरात तलाठी कर्मचारी संघटनेकडुन 31 महसुल कर्मचा-यांनी रक्तदान केले. व तसेच तालुक्यातील एकल महिलांना गॅसचे वितरण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, पुणे आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी, कर्मचा-यांना एक विरंगुळा म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान सादर गीतांना उपस्थित कर्मचा-यांनी दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे व सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसीलदार विजय अवधाने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, भागवत गायकवाड, शंभुराजे पांचाळ, संतोष गवळी, वजिर मनियार, एपीओ चव्हाण, जगदिश लांडगे, दिपक रेड्डी, महेश क्षीरसागर, शिवलिंग एरटे, विद्यादर कोळी, ब्रह्माणंद मठपती, यांच्यासह लोहारा तहसिल कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.