उस्मानाबाद /प्रतिनिधी-:  महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीत शानदार विजय मिळविल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ, भाजपाचे प्रदेश सदस्य अ‍ॅड़ मिलिंद पाटील यांचा तसेच राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार राज्यस्तरीय पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हा वकिल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अ‍ॅड़ राजेंद्र धाराशिवकर यांचा येथील पुरोहित ब्रह्मवंदांच्या वतीने बुधवारी(दि़३१)सत्कार करण्यात आला़ यावेळी पुरोहित गजानन घुगीकर, संतोष रामदासी, प्रविण पानसरे, प्रद्युम्न सांजेकर, उन्मेष दहिटणकर,निलेश कुलकर्णी, श्रीहरी कुलकर्णी आदी उपस्थित होते़ 

 
Top