उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा बजगुडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मेडसिंगा यांचे उपसरपंच सुधिर पाटील यांची शिवक्रांती संघठनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सुधिर पाटील हे १९९२ पासुन आ. विनायक मेटे यांचे निकटवर्तीय असुन अखिल भारतीय मराठा महासंघ शिवसंग्राम या संघटनेचे उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन त्यांनी यापुर्वी काम केले आहे. परंतु विनायक मेटे यांच्या कार्यपध्दतीला कंटाळुन त्यांनी शिवसंग्रामला रामराम करत शिवक्रांतीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेश गिरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष इंद्रजीत कुलकर्णी, तहसीलाध्यक्ष बापु कांबळे, उपाध्यक्ष ऋषिकेश जगदाळे, शहराध्यक्ष रोहित कदम, उपाध्यक्ष रूपेश शेट्टे, परंडा तहसीलाध्यक्ष समाधान चव्हाण, अमोल सुर्यवंशी, अनिकेत आगळे, बंटी सलगर, अमिर मुजावर, ओम आडसुळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top