उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्वतंत्र विद्यापीठासाठी जे आवश्यक इमारती व जागा आवश्यक असतात. त्याची पुर्ण पुर्तता झाली असून , उस्मानाबाद मध्ये स्वतंत्र विद्यापीठाचे निर्माण करावे या प्रमुख मागणीसाठी  स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून काढून विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिका-यांना देण्यात आले. मोर्चामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकातून स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाला सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरू झालेला मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण उच्च व तंत्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. उच्च व तंत्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे या जिल्ह्यातून पुणे, मुंबई यासह इतर शहरामध्ये विद्यार्थी व पालकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांची उच्च शिक्षणाची आवड असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. उच्च शिक्षणासाठी स्थलांतरीत होणाऱ्या विद्याथ्र्यांना जिल्ह्यातच तांत्रिक, व्यावसायिक, व्यवस्थापन, विज्ञान, कृषी इत्यादी ज्ञानशाखेतील अत्याधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची गरज आहे. औरंगाबादला विद्यापीठाचे मुख्यालय असल्याने उमरगा, लोहारा तालुक्यातील अनेक महाविद्यालयातील विद्याथ्र्यांला 350 किमीचा प्रवास करून शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, यासह इतर मांगण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर समितीचे अध्यक्ष अॅड. संजय भोरे, कार्याध्यक्ष संजय तनमोर, उपाध्यक्ष विक्रम राऊत, विशाल गावसाने, वैभर वीर, अभिजीत चव्हाण, आकाश बागल, अॅड. अजिंक्य देशमुख, प्रसाद मुंडे, सुजय देशमुख, रमिझ शेख, सागर शिंदे, आशिष लोंढे, सचिन पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत. 
 
Top