उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवक्रांती एक सामाजिक चळवळ आहे, कोणत्याही राजकारणाशी कसलाही संबंध नाही, इतरांनी ही कुठलेही राजकारण न करता आरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तात्काळ पुर्ण करण्यासाठी छत्रपतींच्या वंशजाची नेमणुक करून विनायक मेेटे यांना काढुन टाकावे, अशी मागणी शिवक्रांती युवा परिषद चे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश बजगुडे पाटील यांनी केली आहे.
शिवक्रांती युवा परिषद ने १ ऑगस्ट २०१९ रोजी तुळजापूर येथून तुळजापूर ते वेरूळ शिवजागर अभियानाची सुरूवात केली.  हे अभियान आज उस्मानाबादेत आले होते. शिवक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर ही संघठना महाराष्ट्रभर काम करीत आहे. सर्वसामान्याच्या प्रश्रांवर आवाज उठवून शासनदरबारी आवाज उठविण्याचे काम करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला महाराजांच्या शिवस्मारकाचे ५ वर्ष नंतर ही विसर पडला आहे. विशेष म्हणजे या शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भुमिपुजन केले होते. शिवस्मारकाच्या अध्यक्षस्थानी घेतलेल्या कार्यक्रमात पवार नावाच्या कार्यकत्र्यांचा जीव ही गेला. परंतू या शिवस्मारकाची अद्याप एक ही वीट रचली गेली नाही. त्यामुळे शिवस्मारकाचे अध्यक्ष विनायक मेटे यांची हाकालपट्टी करून छत्रपतींच्या वंशजाची नियुक्ती करावी, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, कोपर्डी हात्याकांडाला तीन वर्ष पुर्ण होऊन सुध्दा अद्याप पर्यंत आरोपींना फासी झालेली नाही. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनात मरण पावलेल्या समाजबांधवांच्या कुटूंबाला शासकीय मदत द्यावी, गरजूवंत युवकांना आण्णासाहेब पाटील महामंडळाने कर्ज द्यावे या सर्व प्रकरणात तात्काळ सकारात्मक निर्णय सरकार ने घ्यावा, नसता शिवक्रांती संघठना राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष इंद्रजीत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष बापु कांबळे, उपाध्यक्ष ऋषीकेश जगदाळे, शहराध्यक्ष रोहित कदम, उपाध्यक्ष रूपेश शेट्टे, परंडा तालुकाध्यक्ष समाधान चव्हाण, उस्मानाबाद संपर्क प्रमुख राजेश गिरी, अमोल सुर्यवंशी, अनिकेत आगळे, बंटी सलगर, अमिर मुजावर, ओम आडसुळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top