तामलवाडी /प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल तर त्यासाठी भरपुर मेहनत करावी लागेल असे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यानी तामलवाडी ता तुळजापुर येथे स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
शिक्षण घेऊन सैराट होत असलेल्या तरूणाना एक दिशा मिळावी व तामलवाडी व परीसरातील विद्यार्थी अधिकारी बनावेत या उदात्त हेतूने तामलवाडी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सदस्य दत्तात्रय शिंदे यानी स्वखर्चाने भास्कर स्पर्धा परीक्षा मोफत वाचनालय चालु केले.या वाचनालयाचे उद्घाटन दि.2 रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे,बालाजी अमाईन्सचे संचालक डी.राम रेड्डी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. सरस्वती मंगल कार्यालय येथे प्रथमत: सरस्वती मातेच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजकाच्या वतीने मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही असे सांगुन पुस्तक वाचल्याने जेवढे ज्ञान मिळते ते इतर कुठल्याच पद्धतीने मिळत नाही त्यासाठी फक्त वाचन करणे महत्वाचेे ठरते असे जिल्हाधिकारी यानी बोलताना सांगितले.ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कोणतीही मदत लागल्यास ती आम्ही नक्कीच देऊ व वाचनालयाकरीता विविध अभ्यासक्रमाची पुस्तके देणार असल्याचे बालाजी अमाईन्सचे संचालक डी राम रेड्डी यानी सांगितले.
यावेळी मंचावर शांतिब्रम्ह तुकारामभाऊ,उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिराशे,वित्त व लेखा अधिकारी किरण घोटकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक मंजुषा सानप,संतोष बोबडे,संतोष जाधव,दत्तात्रय वडणे तसेच परीसरातील गुणवंत विद्यार्थी,पालक,सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.