जिला  संवाददाता । उस्मानाबाद  -
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे मुख््यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा एक सप्टेंबर रोजी उस्मानाबाद शहरात येत असून दुपारी २ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.त्यादिवशी महाजनादेश यात्रेचा सायंकाळी सोलापूर येथे समारोप होणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.
गुरूवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, मिडीयाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, डॉ.गोविंद कोकाटे, इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदे मध्ये अधिक माहिती देताना, दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा १ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर मधून उस्मानाबादकडे येणार आहे. पाडोळी, सारोळा, सांजा येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत समारंभ होणार आहे. तर सांजापासून उस्मानाबाद शहरापर्यंत युवामोर्चाच्या वतीने युवकांची भव्य मोटारसायकल रैली निघणार आहे. उस्मानाबाद शहरात मल्टीर्पपज मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दुपारी २ वाजता होईल. त्यानंतर मुख्यमंत्री तुळजापूरकडे रवाना होतील. तुळजापूरमध्येपण स्वागत कार्यक्रम हो्ऊन ही महाजनादेश यात्रा सोलापूरकडे रवाना होईल. सोलापूर मध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या नियोजनासाठी कोअर कमिटीची बैठक झाली असून सर्वजण कामाला लागले आहेत. उस्मानाबाद व सोलापूर मध्ये या यात्रेची जबाबदारी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे आहे.

 
Top