प्रतिनिधी /उमरगा-
कृष्णा-मराठावाडा सिंचन योजनेतून 23.66 टीएमसी पाणी जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, या योजनेचे पाणी येत्या चार वर्षात जिल्ह्यात आणल्याशिवाय शांत बसणार नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने सात टीएमसी पाणी मिळण्यासाठी मान्यता दिली असून अतिशय वेगाने हे काम प्रगतीपथावर आहे. योजना कार्यांवित झाल्यास जिल्ह्यातील एक लाख 15 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
कोयना आणि टाटा विद्युत समूहाच्या तज्ञ समितीत राज्य सरकारच्या वतीने आमदार सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी (दि. 21) उमरगा येथे ते प्रथम आले होते. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदमध्ये आमदार ठाकूर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष माधव पवार, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती युवराज जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रमेश माने आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले कि, सिंचन योजनेसाठी गेल्या आघाडी सरकारच्या काळात पुरेसा निधी मिळत नव्हता. मिळालेल्या निधीतून नेत्यांचे सिंचन झाले, कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. मात्र, पाणी मिळाले नाही. एकीकडे पुर तर मराठवाड्यातील दुष्काळीस्थिती भयानक आहे. कृष्णा योजनेच्या माध्यमातून सरकारकडून योजना कार्यान्वित होण्या साठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. या योजनेतून 23.66 टीएमसी पाणी जिल्ह्यात उपलब्ध होणार असून हे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी असणार आहे, असेही ठाकूर म्हणाले. यावेळी नगरसेवक इरप्पा घोडके, अरुण इगवे, आकाश शिंदे, अमर वरवटे, संजय कोथळीकर, नेताजी गायकवाड, सयाजी चालुक्य, दत्ता रोंगे, किरण रामतिर्थे, महादेव सलके, रोहित सूर्यवंशी, पंकज मोरे आदी उपस्थित होते.