भूम/प्रतिनिधी-
जनता दरबारचा कार्यक्रम संपला एकदाचा, अशा कार्यक्रमात पालकमंत्री बोलतच असतात, असे समजू नका लोकांच्या किरकोळ कामाला विलंब लावू नका नाहीतर कार्यवाहीसाठी तयार रहा, असा सज्जड दम जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री, प्रा.तानाजी सावंत यांनी दिला.
भूम येथे पहिल्यांदाच जनता दरबार भरविण्यात आला होता. या जनता दरबारामध्ये पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी अधिकारी व कर्मचा-यांना अंगातला आळस झटका, सामान्य लोकांना कायद्याची चौकट दाखवू नका, आपला घरचा व्यक्ती आहे , असे समजून काम मार्गी लावा, बॅंक अधिकारी शेतक-यांना कर्ज वितरीत करीत नसतील तर शेतकरी दकडे घेऊन बॅकेत येतील असा इशारा पण दिला. प्रा. सावंत यांनी तीन टर्म आमदार असणा-या राहुल मोटे यांचा उल्लेख न करता प्रत्येक दोन ते तीन महिनाला अशा प्रकारचा जनता दरबार घेतला असता तर लोकांना न्याय मिळाला असता. या जनता दरबारामध्ये आडीच हजाराच्या वर अर्ज आले आहेत, असे असताना तीन-तीन वेळा लोक अशा लोकांना कसे निवडून देतात या जनता दरबारामध्ये कृषी कार्यालय व महावितरण व नगरपरिषद आदी बाबत मोठया प्रमाणात तक्रारी आल्या. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जाला कमी लेखू नका, त्याचा निपटरा त्वरीत करा या कार्यक्रमातच आ. राहुल मोटे यांनी भिषण दुष्काळ असताना चारा छावण्या का बंद केल्या दुष्काळी परिस्थतीमुळे शेतक-यांना पीकविमा कधी मंजूर करण्यात येणार, असे दोन प्रश्न विचारले यावर पालकमंत्र्यानी ३१ ऑगस्ट पर्यंत चारा छावणीची मुदत वाढवून घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने विमा कंपन्याची चौकशी करत आहोत, असे सांगितले. यावेळी जि.प.सदस्य धनंजय सावंत, अनिल सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, भाजपाचे संजय गाढवे, दिलीप शाळू, दत्ता साळुंके, दत्ता मोहिते, गणेश शेंडगे, सुरेश कांबळे, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर आदी उपस्थित होते.
अण्णासाहेब देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश
जिल्हा परिषदचे माजी सभापती व भूम तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब देशमुख यांनी ईट ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यंाचे स्वागत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

 
Top