तुळजापूर/प्रतिनिधी-
 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतील महाध्दार परिसरातील खडकाळ गल्ली येथे श्रावणमासा निमित्ताने बुधवार दि. 8 ते 14 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा  पारायण सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळयाचा आरंभ श्री तुळजाभवानी प्रतिमा, कलश, विणा, टाळ, ग्रंथ, मृदंग, तुलसी, ध्वज, गो-पुजनाने होणार आहे. प्रतिदिन काकड आरती, गाथापारायण, गाथा भजन, महिला भजन, हरिपाट, हरि किर्तन, हरिजागर अदि धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. बुधवार दि. 7 रोजी हभप भागवताचार्य विशाल महाराज खोले,  गुरुवार दि. 8 रोजी रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज,  शुक्रवार दि. 9 रोजी समाज प्रबोधनकार  इंदुरकर महाराज,  हभप खडके महाराज, शनिवार दि 10 रोजी सोनालाताई  करपे,  रविवार दि. 11 रोजी किर्तनकेसरी हभप अनिल महाराज तुपे,  सोमावार दि. 12  रोजी हभप अँड ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर, मंगलवार दि. 13 रोजी दुपारी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असुन राञी  हभप उमेश महाराज दशरथे मानवत यांचे किर्तन होणार आहे. बुधवार दि. 14 रोजी  काल्याचे किर्तन भागवताचार्य हभप समाधान महाराज शर्मा यांचे होवून महाप्रसाद वाटपाने  या सोहळ्याचा सांगता होणार आहे. सर्व हभप महाराजांचे किर्तन रात्री संपन्न होणार आहे व्यासपीठ अधिकारी म्हणून  हभप सौ उज्वला अजित क्षिरसागर यांची उपस्थिती असणार आहे.  या सोहळयात पंचक्रोषीतील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक रणसम्राट कब्बडी संघ यांनी केले आहे.
 
Top