उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक स्वरूप धारण करत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मंगळवारपर्यत तलाठी, ग्रामसेवकांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांसमवेत चर्चा करून पाणी व चाऱ्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्यासोबत पंचायत समिती कळंब व यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद येथे बौठका घेतल्या. जिल्ह्यात जुलै अखेर केवळ 185 मिमी पाऊस झाला असून तो वार्षीक सरासरीच्या केवळ 24 टक्के आहे. कळंब तालुक्यात केवळ 154 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक गांवामध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना चारा छावणीमध्ये पशुधन ठेवणे शक्य होत नाही. टंचाईमुळे चढ्या भावाने शेतकऱ्यांना चारा खरेदी करून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे चारा डेपो सुरू करण्याची मागणी मदत व पुर्नवसन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. टँकर, बोअरवेल अधिग्रहनाची मुदत 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात आली असून लोकसंख्या व पशुधनाच्या संख्येनुसार टँकर अथवा अधिग्रहनाची संख्या वाढवावी. दिवसाच्या भारनियमनामुळे टँकर सुरू असलेल्या गांवामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे टँकर सुरू असलेल्या ठिकाणी दिवसा वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीत उपस्थित महावितरणच्या अधिका-यांना दिल्या.