उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कँपसमधील कृषि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन चार वर्षे संगोपन करण्याची शपथ घेतली.संस्थेचे सचिव डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या सुचनेनूसार वृक्षारोपणात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा,वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कळावे यासाठी येथील महाविद्यालयाने एक झाड,एक विद्यार्थी आणि चार वर्षे हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर झाडे लावायचे आणि चार वर्षे त्याची जोपासना करूनच एक झाड,एक विद्यार्थी आणि चार वर्षे व नंतरच पदवी घ्यायची असा कॉलेज अंतर्गत उपक्रम सुरु केला आहे.त्यासंबंधीची शपथच विद्याथ्र्यांना देण्यात आली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत असा उपक्रम राबविणारे हे पहिलेच महाविद्यालय आहे.महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन त्याची चार वर्षे जोपासना करण्याची जबाबदारी व दुष्काळ , निसर्गाचा असमतोल आणि अन्य बाबींवर मात कशी करावयाची याची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी महाविद्यालयच रोपांची खरेदी करून दिली आहे.तसेच ते झाड लावण्यासाठी खड्डे खोदून दिले आहेत पुढील चार वर्षे या झाडांची काळजी आणि जोपासना करण्याची शपथ विध्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.दंडनाईक,प्रा जी.एम.फरताडे, प्रा.पी.के.गुरव,प्रा.डॉ.एस.एस.बांगर, प्रा.एस.एन.पाटील, प्रा.एस.बी.किर्जत प्रा.एस.बी.कोरके, प्रा.व्ही.टी. नागरगोजे, प्रा.एस.ए.दळवे, प्रा.आर.आर.देशमुख,प्रा.के.बी.थोरात, प्रा.एस. एन.साबळे,प्रा. एन.एस. सुतार,प्रा.आर. बी.रनेर,प्रा. ए.एस. सोंन्ने,अधिक्षक एच.एस.घाडगे, लिपिक डी.एम.घावटे व इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित यांनी सामुहिक शपथ घेण्यात आली.