पुर्वीसारखी शेतीची कामे करण्यास बैंलाची संख्या घटली असून मोठया प्रमाणात शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. त्यामुळे शेतक-यांनी विचार करून जॉन डियरची ट्रॅक्टरे खरेदी करावीत. शेतकरी आत्मनिर्भर असून सरकारच्या धोरणामुळेच शेतीचे वाटोळे झाले असून त्यामुळे शेतक-यांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करावी, व आपल्या परिसराचे हिरवळीत रूपांतर करावे, कारण झाडे व पत्नी शेवटपर्यंत साथ देतात. त्यामुळे देशी वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करावी, असे आवाहन अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले.
येथील मधुबन ट्रॅक्टर्सच्या शोरूमचे उद्घाटन शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, चला हवा येऊ द्या फेम अरविंद जगताप, माजी आ. राजाभाऊ राऊत, जोन डियर ट्रॅक्टरचे वरिष्ठ व्यवस्थापक संजीव भट, अंकित सक्षणा भाजपा नेते सुधीर पाटील, पत्रकार राजाभाऊ वैद्य, नगरसेवक सोमनाथ गुरव, डॉ.गोविंद कोकाटे, प्रशांत पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, डॉ.उमेश घाटगे, अॅड. विक्रम सावळे, नवनाथ कसपटे, प्रविण कसपटे, रविंद्र कसपटे आदीं उपस्थित होते.
पुढे बोलताना सयाजी शिंदे यांनी नवनाथ कसपटे यांनी उभारलेल्या सिताफळाचे व बागेचे व त्यांनी केलेल्या संशोधनाचे कौतुक केले. जो चांगला ऑक्सिजन घेऊ शकतो, तो खरा श्रीमंत, झाडांचे ऊन घेऊन झाडांचे गुण गाऊ, गावच्या यात्रेत, झाडाची मिरवणुक काढावी. जर देशाचा शेतकरी, मागे गेला तर देश मागे गेला असे, नक्की समजावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, आपला जिल्हा दुष्काळी असल्यामुळे दुष्काळात ट्रॅक्टरचा जोड धंदा केल्यास शेतक-यांना कांही अंशी उत्पन्न मिळू शकते. कोरडया तलावातील गाळ शेतात आणुन टाकने व अन्य कामेपण सजहरित्या होऊ शकतात, जिल्हयाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नवनाथ कसपटे यांनी सिताफळा विषयी चालवलेली मुहिम कौतुकास्पद असून शेतक-यांना उभारी देणारी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संजय भट यांनी शेतक-यांच्या हितासाठी कंपनी आलेल्या उत्पन्नातुन मोठया प्रमाणात निधी शेतक-यांच्या हितासाठी वापरला जातो या संदर्भात माहिती दिली, यावेळी , माजी आ.राजाभाऊ राऊत,अरविंद जगताप अॅड. विक्रम सावळेे, डॉ.गोविंद कोकाटे यांचे ही भाषण झाले. प्रविण कसपटे यांनी प्रास्ताविक केले. तेर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रनिती कदम, आभार डॉ.नवनाथ कसपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.