तुळजापूर/प्रतिनिधी-
 शारदीय नवराञउत्सवाचा पंधरा दिवसाचा कालावधीत पुर्वपरंपरे प्रमाणे शहाजी महाद्वारातून भाविकांना मंदीरात दर्शनार्थ सोडून भक्तांना दिलासा देण्याची मांगणी भाजपा नेते रोहन देशमुख यांनी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान‘या प्रशासकीय अधिकारी तथा विश्वस्त तहसिलदार योगिता कोल्हे  यांची भेट घेवून केली .यावेळी तहसीलदार योंगिता कोल्हे यां‘याशी रोहन देशमुख यांनी केली चर्चा संदर्भात सकारात्मकता दर्शवत यावर मार्ग काढण्यासाठी पुढील आठवड्यातच जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यां‘यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
 यावेळी भाजप पदाधिकारी सत्यवान सुरवसे, गजानन वडणे, पंकज पाटील, दत्ता राजमाने, बालाजी शिंदे, बाबा वटेकर, मकरंद लबडे, शिवाजी सरडे, विजय शिंगाडे,  दादा घोडके, सचिन अमृतराव, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, उमेश गवते, अनंत  भूरांडे, बाळू शामराज, बाळासाहेब भोसले, सचिन अमृतराव आदी उपस्थित होते.

 
Top