उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आपल्या डॉक्टर पत्नीला जांच करून छळ करणे व मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून इंग्रजीत तीन वेळा तलाक दिल्याच्या कारणावरून डॉक्टर शफी मुजावरच्या विरोधात  मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा २०१९ नुसार उस्मानाबाद जिल्हयात पहिला गुन्हा २२ ऑगस्ट २०१९ च्या रात्री नोंद दाखल करण्यात आला.
डॉ. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ७/५/२००७ रोजी मुस्लिम रिवाजाप्रमाणे माझ्या वडिलांनी लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोन वर्ष व्यवस्थीत संभाळले. त्यानंतर त्रास देण्यास सुरूवात केली आहे. कौंटुबिक हिंसाचार करणे, विवाह बाह्य संबंध ठेवणे आदी कारणामुळे मतभेद निर्माण होत गेले. यानंतर वडिलांनी व नातेवाईकांनी वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू डॉक्टर असलेला पती सुधारण्याऐवजी बिघडतच गेला. ६ जानेवारी २०१९ रोजी इंग्रजीत तीन वेळा माझ्याकडून तुला तलाक आहे, असा दोन वेळेस मेसेज पाठविला. यामेसेजमध्ये शिवीगाळ करण्यात आलेली आहे. या जबाबाप्रमाणे आनंदनगर पोलिस ठाण्यात आरोपी डॉ.शफी मकसुद मुजावर रा.आनंदनगर उस्मानाबाद यांच्या विरोधात ट्रिपल तलाक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
Top