उस्मानाबाद /प्रतिनिधी- राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेंतर्गत सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळामार्फत संगणक परिचालक म्हणून नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संदीप कोकाटे, निलेश दिवाणे, नवनाथ तवले, गणेश जावळे, रोहित अडसूळ, रमेश उलगे, प्रशांत दिवाणे यांच्यासह इतर पदाधिकारी व संगणक परिचालकांची उपस्थिती होती.