परंडा/ प्रतिनिधी-येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थाना मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, परंडा हरित शहर ,सुंदर शहर या संकल्पनेतून शहराला सुजलम सुफलम करण्यासाठी महाविद्यालयाने या स्तूत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.दीपा सावळे उपास्थित होत्या. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले,भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधिक्षका शितल लेकूरवाळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.सचिन चव्हान, प्रा.सचिन साबळे तसेच सांस्कृतिक विभागप्रमूख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रा.डॉ.प्रकाश सरवदे, प्रा.डॉ.अतूल हुंबे, प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.विद्याधर नलवडे, प्रा.सज्जन यादव, प्रा.अक्षय घूमरे, प्रा. जगन्नाथ माळी, प्रा अमर गोरे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित विद्यार्थाना मुख्याधिकारी दिपक इंगोले,शितल लेकूरवाळे आणि प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी वृक्ष लागवड विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थाला मोफत वृक्ष देऊन त्यांना त्या वृक्षाची निगा राखण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा डॉ सचिन चव्हान यांनी केले तर आभार प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व प्रांगणामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली व प्रत्येक विद्याथ्र्यांला मान्यवरांच्या, प्राध्यापकांच्या हस्ते एक वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.