उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कारा ने मल्लिकार्जुन दशरद सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 दि. 27 जुलै रोजी मुंबई येथील मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक अजय आंबेकर, जेष्ठ पत्रकार  रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 51 हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. यापूर्वी सोनवणे यांना महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार, कै. अनंत भालेराव स्मृती विशेष वार्ता पुरस्कार, समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार, कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती राष्ट्रीय कृषी वार्ता पुरस्कार, राजामाता जिजाऊ स्वालंबन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पत्रकारिता पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार आदीसह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top