उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी येथे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या आमदार निधीतून गावातील नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी आरो प्लँट साठी निधी देण्यात आला. जि.प.उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते आरो प्लॅंटचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जि.प.च्या शिक्षण विभागाच्या वतीने गावातील शाळा दुरुस्तीसाठी देखील निधी देण्यात आला होता. शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते शाळा इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सौ.अर्चनाताईनी विद्याथ्र्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या तसेच ग्रामस्थांबरोबर आढावा बैठक घेवून गावातील सामाजिक समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावच्या सरपंच सौ.ज्योती अजित खोत, जेष्ठ कार्यकते अच्युत जराड, जीवन वीर, रुपचंद कावळे यांच्यासह गावातील नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या.