उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जलसंवर्धन, मृदासंवर्धनावर काम केल्यास भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही, सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या संस्था व व्यक्तीला प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी केले.
एकता फाउंडेशन,उस्मानाबाद व शिवार संसद युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गोरोबाकाका पादुका मंदिर वाणेवाडी येथे आयोजित कीटकनाशक सुरक्षा किट व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता व चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे, जि. प. कृषी अधिकारी डॉ.टी.जे.चिमन्नशेट्टी, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, शिवार संसद संस्थेचे अध्यक्ष विनायक हेगाणा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताने ते म्हणाले की, शेतकरी हिताच्या उपक्रमांसोबत जलसंवर्धन आणि मृदासंवर्धन याही गोष्टींकडे लक्ष दिले तर भविष्यात उभी राहणारी पाणीटंचाई आपणास कमी करता, एकता फाउंडेशन उस्मानाबाद व शिवार संसद यांनी शेतक-यांना वाटप करीत असलेल्या सुरक्षा किटमुळे शेतात फवारणी करताना होणारा त्रास कमी होईल व त्याच सोबत समस्त वाणेवाडी ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड, जलसंवर्धन मध्ये सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे, असे आवाहन यावेळी पराग सोमण यांनी केले.
श्री. भारत गणेशपुरे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्हा माहिती आधिकारी मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एकता फाउंडेशन व शिवार संसद च्या वतीने लोकराज्य या शासकीय मासिकाचे वितरण, या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
शेतक-यांनी सुरक्षा किट वापरले तर पुढे होणारा धोका टळणार असून फवारणी करताना शेतकऱ्यांनी वाटप केलेली सुरक्षा किट फवारताना वापरावे, असे आवाहन जि.प.चे कृषी अधिकारी डॉ.टी.जे.चिमन्नशेट्टी यांनी केले. त्याचबरोबर सुरक्षा किट फवारताना कशी वापरायची याबाबतचे प्रात्यक्षिही यावेळी त्यांनी करून दाखवले. कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळा वानेवाडी येथे वृक्षारोपण करून झाली. यावेळी आजपर्यत एकता फाऊंडेशने केलेल्या सर्व कामाचा आढावा सांगत वाणेवाडीला एकता फाऊंडेशन च्या वतीने सर्वातोपरी सहकार्य करण्याची ग्वाही एकता फाऊंडेशनचे सचिव आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुभाष हिंगमिरे यांनी केले. यावेळी एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, उपसरपंच प्रमोद उंबरे, एकता फाउंडेशनचे सचिव अभिलाष लोमटे, सचिन बारस्कर, आनंद खडके, यशवंत लोमटे, आदित्य लगदिवे, किरण वारे पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कृषी महाविद्यालय गडपाटी व किणी येथील सर्व कृषिदूत, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व समस्त वाणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
