शासनाच्या विविध अनेक योजना गोर,गरिबांसाठी आहेत परंतु कांही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उदासिनतेमुळे त्या माहित केल्या जात नाहित त्यामुळे या योजना खेडेगातील ख—या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाहित त्या विद्यार्थ्यांनी पोहचवाव्यात असे आवाहन दिनकर कोळगे (जिल्हा माहिती दूत समन्वयक) यांनी जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद,युवा माहिती दुत व रामकृष्णं परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतिने नुकताच "युवा माहिती दुत"कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी केले आहे. आयोजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती दुत समन्वयक संतोष कोळी,तालुका समन्वयक दिनकर कोळगे हे होते.यावेळी विविध शासकीय योजना अॅपवर असणा—या विद्यार्थ्यांना डाऊन लोड करून देऊन त्या खेडेगावातील गरिब,होतकरू ग्रामस्थांना पोहचवण्याचे आवाहन दिनकर कोळगे यांनी केले.
प्रास्ताविक प्रा.माधव उगगीले यांनी केले .सूञसंचालन प्रा.एस.जे.नागरगोजे यांनी केले.
यावेळी प्रा.मोहन राठोड,प्रा.राजा जगताप उपस्थित होते.यावेळी एन.एस.एस.चे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
