तुळजापूर/प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह पंचक्रोषीतील गावात नागपंचमी सण पारंपारिक पध्दतीने नागदेवतेचे पुजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मंदीरात भवानी शंकर महादेव मंदिरातील मंहादेव  पिंडीवरील  नागाच्या फणाच्या मुर्तीचे चरणतिर्थ नंतर विधीवत  होमकुंडासमोर आणुन त्याचे विधीवत प्रतिष्ठापना  करण्यात आल्यानंतर दिवसभर शहरातील नागरिकांनी मंदीरात येवुन या नागदेवतेचे पुजन करुन दर्शन घेतले. तसेच तिर्थ खुर्द येथील नागनाथ मंदीरात दर्शनार्थ भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती ग्रामीण भागात वारुळाचे पुजन  महिला वर्गाने केले . महिला वर्गाने झोके खेळुन मंदीरात फेरधरुन  फुगड्या खेळुन नागपंचमी सण मोठ्या उत्सात साजरा करण्यात केला. सध्या पावसाची सततधार सुरु असल्याने सर्वञ पाणी पाणी झाल्याने या आनंदाचा वातावरणात  यंदा खास महिलाचा  सहभाग असणारा नागपंचमी सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

 
Top