प्रतिनिधी/तुळजापूर
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात सोमवारी महिलांच्या वतीने फेर, बुलई आदी खेळ खेळून नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. नागपंचमीनिमित्त सोमवारी सायंकाळी 5 ते 6 एक तास मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद करण्यात आला होता. 
सासुरवासीन महिलांचा प्रमुख सण असलेली नागपंचमी सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात होमकुंडासमोर नागदेवतेच्या मूर्तीवर लाह्या, दूध अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती. नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार यामुळे भाविकांत उत्साह होता. तुळजाभवानी मंदिरात हिंदू परंपरेनुसार सर्वच प्रमुख सण तसेच राष्ट्रीय उत्सव परंपरेने साजरी करण्याची प्रथा आहे. यामध्ये गणेश उत्सव, दसरा, दीपावली, रंगपंचमी, गुढीपाडवा या सणासह 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आदी राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात येतात. 

 
Top