उस्मानाबाद/प्रतिनिधी-
विद्याथ्र्यांनी जीवनात स्वप्न पाहिली पाहिजेत, ते साकार करीत असताना आई-वडिलांची किंमत करणाराच एक चांगला व्यक्ती बनत असतो. आपण पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा, आपल्यातून चांगले अधिकारी घडावेत आणि त्याचबरोबर आपल्याकडून समाजासाठी सेवाभाव घडावा, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग प्रकल्प मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली चे अपर विकास आयुक्त आनंद शेरखाने यांनी येथे केले.
रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित कौशल्य व उद्योग विकास शिबिर व विद्यार्थ्यांशी चर्चा संवाद कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून विद्याथ्र्याांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, श्री. दत्ता कुलकर्णी श्री. नितीन काळे, सहायक निदेशक श्री. मनोज शर्मा, श्री. सुभाष इंगेकर,श्री. धनंजय जोहरी, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. प्रकाश हनबर,श्री. शिवशरण, तहसिलदार श्री. राजकुमार जी. केलूरकर, गटविकास अधिकारी श्री. सुरेश तायडे, कार्यक्रम समन्वयक श्री. सचिन सूर्यवंशी, माजी जिप सदस्य श्री. रामदास कोळगे, श्री. राजनारायण कोळगे, ग्रामपंचायत सदस्य श्री. बालाजी कोळगे, प्रा. जयप्रकाश कोळगे , श्री. शिवाजी बारगुळे ,श्री. शिवाजी पवार, श्री. पोपट नलावडे, श्री. भोईटे ए.के, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुतार जी. एम. हे  उपस्थित होते.
श्री. शेरखाने पुढे म्हणाले, विद्यालयातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून उच्चपदस्थ झाले. त्यांचा मेळावा घ्यावा, कारण या विद्यार्थ्यांना त्यांचा सहवास लाभला, तर त्यांचे गुण विकसित होतील. आपल्याला आवडणारा विषय घ्यावा. आवडणारी शाखा निवडावी. शिक्षणाबरोबरच खेळामध्ये आवड ठेवावी. लष्करात जाऊन देशसेवा करावी. आपण दहा वर्षात समाज बदलू शकतो कारण पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण चांगले घेऊन आपल्यातील गुण विकसित करावे. चांगल्या गुणांना आत्मसात केले. तर आपल्याकडून चांगलेच कार्य घडते. शिक्षण घेतले तर चांगले वाईट समजते. समाजासाठी सेवाभाव आपल्याकडून घडावा अशी अपेक्षा व्यक्त  केली .
राज्य आणि केंद्र यांच्याकडून ब-याचशा योजना येतात, मात्र त्या योजनेसाठी येणारा सर्व निधी कामाला न येता 60 टक्के निधी परत जातो. म्हणून प्रत्येक गावात लहान-मोठे उद्योग उभारण्याचा मानस बाळगावा असेही त्यांनी  सुचविले.
यावेळी श्री.शेरखाने  यांनी आसपासच्या गावातील महिला बचतगटाच्या महिलांनी उत्पादित वस्तूंच्या स्टॉलचे उद्घाटन करुन त्यांच्याशीही  संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.  विद्यालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी  श्रीमती  दीपा मुधोळ - मुंडे उपस्थित होत्या.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ग्रामीण भागातून आपण उच्चपदस्थ झालात. आणि गावचे सुपुत्र म्हणून ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करीत आहात. हा आपला आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षक व पालकांनीही संस्कार घडविण्याची जबाबदारी ओळखावी. मुलांनी मोठ्यांचा आदर करावा,संस्कारक्षम बनावे तसेच मुले संस्कारी झाली तर नक्कीच उच्चपदस्थ होतील. अशी अपेक्षाही व्यक्त केली. याप्रसंगी अॅड श्री. मिलिंद पाटील यांचे महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिलच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत गरजू व्यक्तींना रेशन कार्ड व गॅस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. डोंगरे के. ए , त प्राचार्य कपाळे एस. एस, उपप्राचार्य श्री. भोसले डी. डी. शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राऊत आर. जी. तर आभार माजी जिप सदस्य श्री. रामदास अण्णा कोळगे यांनी मानले.
 
Top