लोहारा शहरातील पत्रकार गिरीश भगत यांना पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबध्दल समाज विकास संस्था (उमरगा) यांच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक कै.मधुकर धस स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवुन सन्मानीत करण्यात आले.
पत्रकार गिरीश भगत यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार बालाजी बिराजदार, मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा भाजप मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, तलाठी जगदिश लांडगे, नगरसेवक आबुलसाहेब कादरी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, बाबासाहेब जाधव, बळवंत जगताप, यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
