उस्मानाबाद /प्रतिनिधी-जिल्हा परिषद (लिपिक वर्गीय) कर्मचारी सहकारी पतसंस्था म ;  उस्मानाबाद च्या नवीन इमारतीचा बांधकाम शुभारंभ आज दि.१३ जून २०१९ रोजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमास जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.संजय तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.एच.व्ही.वडगावे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक कर्मचारी वृंद व संस्थेचे सभासद उपस्थित होते.
 
Top