तुळजापूर/प्रतिनिधी-
 लोकशाही वाचविण्यासाठी पूनश्च बँलेटपर वर मतदान घ्या ईव्हीएम तोडा आणि फोडो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. छञपती उदयनराजे भोसले यांनी श्रीतुळजाभवानी मातेस साकडे घातल्यानंतर पञकारांशी बोलताना केले.
श्री तुलजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात पञकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मुखमंञी पद माझ्यासाठी गौण बाब  आहे. राजकारणामुळे राजकारणी लोकांचे भले झाले जनतेचे नाही असे स्पष्ट करुन आजपर्यत झाले ते गेले आतायापुढे  पदावर नीट बसा त्यावर बसुन समाजहिताचे निर्णया  घ्या राजकारण करु नका नाहीतर जनता यापुढे पदावर बसु देणार नाही हे लक्षात घ्या पदावर बसुन राजकारण करणा-यांना बसु देवु नका पेटवा पेटवी करु नका,असे यावेळी म्हणाले .
ईव्हीएम मशीन बाबतीत बोलताना खा भोसले म्हणाले की, बटण दाबल की कुठे मत जातय हे कळत नाही,अशी जनतेत चर्चा आहे.लोकशाही टिकवण्यासाठी पुर्वीसारखी बँलैट पेपरची मागणी होते आहे ती मान्य करावी ईव्हीएम मशीन आळशी मतदारांसाठी असल्याची टिका केली. ईव्हीएम  कुणी बनवली माणसाने ना. संगणक हँक करता येवु शकते तर ईव्हीएम का करता येणार नाही ज्याने ईव्हीएम बनवली त्याला मेक कशी मारायाची असते हे माहीत, असते तो मेक मारतोच. पक्षांबाबतीत  बोलताना खा. भोसले म्हणाले की पक्षाऐवजी मतदारांचा विचार करा  लोकशाही अबाधीत राहावी यासाठी गांधीजींनी चळवळ सुरु केली होती ती पुन्हा सुरु  करावी लागती  काय असे यावेळी म्हणाले .
 
Top