प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसर विभागप्रमुखपदी डॉ. मिलिंद माने यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी डॉ. मिलिंद माने यांची नियुक्ती केली. उस्मानाबाद जिल्ह्याची शैक्षणिक निकड लक्षात घेऊन पदार्थविज्ञान, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे चार विभाग २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत. डॉ. माने हे व्यंकटेश महाजन महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत आहे. या विभागाच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. या वेळी बैठकीस नाट्य कलावंत व अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले, विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. प्रशांत चौधरी यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, संचालक डॉ. अनार साळुंके आदींनी अभिनंदन केले. 
 
Top