तुळजापूर/प्रतिनिधी-लवकरच सुरु होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर  तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक कार्यकते  प्रशांत नवगिरे यांच्या पुढाकारातून तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे अनाथ
मुलांच्या संगोपनासाठी कार्यरत असलेल्या " आपलं घर " येथील विद्यार्थ्यांना,'जेष्ठ समाजवादी विचारवंत श्री. पन्नालाल ( भाऊ) सुराणा यांचे हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात आला. 
    या कार्यक्रमास मनसेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, ष महेश जाधव,  मयुर गाढवे,  जोतिबा येडगे, मल्लिकार्जून कुंभार,मनसेचे  धनाजी साठे, झुंबर काळदाते,महेश डोलारे,  अलिम शेख सह अनेक जण उपस्थितीत होते 
 
Top