उस्मानाबाद/प्रतिनिधी- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सिद्धीविनायक संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या उपस्थितीत व फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते दत्ताभाऊ कुलकर्णी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी फेडरेशनच्या सचिव सुरेखाताई लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
Top