उस्मानाबाद/प्रतिनिधी-
१७ जून रोजी पु.वि.लोकराज्य ने राज्यात सात नवीन महाविद्यालयांना मंजुरी, उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे काय ? या बातमीची दखल घेऊन भाजपाचे एक शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांना भेटले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांनी महाजन यांना गतवर्षी महाआरोग्य शिबीरामध्ये आपण केलेल्या घोषणेचा संदर्भ देत विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलेले व जाहीर करण्यात आलेले मुद्दयांची आठवण करून दिली.
यावेळी मंञीमहोदयानी तात्काळ आदेश देऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणा-या मंजुरी प्रस्तावात उस्मानाबाद जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचे नाव समाविष्ट करण्यास सांगितले व लवकरात लवकर महाविद्यालय मंजुरी प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले.या शिष्टमंडळामध्ये भाजपा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्री.दत्ता कुलकर्णी, महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे, प्र.का.स.नितीन काळे,अॅड.श्री.खंडेराव चौर आदींची उपस्थिती होती.
आ.सुजितसिंह ठाकुर यांनी जिल्हयाच्या विकास प्रश्रांसाठी अथक परिश्रम घेऊन २१ टीएमसी सारखा पाण्याचा प्रश्न व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग प्रामाणिकपणे प्रयत्न करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या दृष्टीकोंनातुन पाणी उपलब्ध प्रमाणपत्र व इतर कामे मोठया प्रमाणात सुरू झाली आहेत.