उस्मानाबाद/प्रतिनिधी- डॉ. व्ही.के.पाटील शैक्षणिक संकुल, आळणी येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक बार्शी व डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशन कँपस,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.सदर रक्तदान शिबीरासाठी डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एस.बी.ननवरे,बी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम.व्ही.शिंदे, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ.कैलास मोटे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे,कृषि महाविद्यालयाचे एच. एस. घाडगे व डॉ .व्ही .के .पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच भाग्यलक्ष्मी स्वयंरोजगार व सहकारी संस्था म.भूम संचालित इंदापूर ता.वाशी येथील गुरांच्या चारा छावणीतील जनावरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 370 जनावरांना जंतनाशक औषध पाजणे,170 गर्भ तपासणी,100 वंध्यत्व तपासणी व 39 जनावरांना औषधोपचार करण्यात आले.यावेळी डॉ एम.व्ही.कुलकर्णी,पशुधन विकास अधिकारी वाशी,डॉ.व्ही.आर.खुणे, पशुधन पर्यवेक्षक इंदापूर,डॉ.एल.बी. देशमुख यांनी जनावरांची तपासणी केली.यावेळी बाबासाहेब पाटील,टाचतोडे सर,थोरात सर, बोबडे सर,औदुंबर जाधव,प्रदीप बोराडे, अमोल वाघमारे,प्रसाद मुळे,जयराम गपाट,प्रफुल्ल कदम,नितीन मुळे,नाना गपाट,लिंबराज मुळे,नवनाथ शिंदे, भीमराव गपाट,निलेश शिंदे,लहू गपाट व शेतकरी उपस्थित होते.