उमरगा /प्रतिनिधी-
सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे . अद्याप पावसाचे आगमन झाले नाही . जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . शेतकऱ्यांचे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे . असे असतानाही पोटच्या लेकरा प्रमाणे सांभाळलेल्या मुक्या पशुधनांचा सन्मान व्हावा यासाठी उमरगा तालुक्यातील कदेर येथे दुष्काळातही बैलांचा राजा सर्जा महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .
गेल्या चार दिवसा पासून हा म्होत्सव साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू होती . माटाठ्या , झुली , घागर माळे , रंगीबेरंगी गोंडे , पिवडी , गुलाल , वारनीस लावून बैलांची रंगविली जाणारी शिंगे , बैलांच्या सजावटीत पशुपालक शेतकरी मग्न झाले होते . सर्वत्र कारहुन्वी अर्थात बैल पोळ्याच्या या उत्सवा मुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते . घराघरावर अंब्याची तोरणे बांधून गृहीणी मुक्या पशुधनांची पुजा करुन पुरणपोळीचा घास भरविण्यात धन्यता मानत होत्या .
खरीप पेरणी हंगाम सुरू होताच कदेर गावाला बैल पोळ्याच्या कारहुनवी सणाची चाहुल लागते . पेरणी हंगाम सुरु होण्याच्या अगोदर या गाव परिसरातील शेतकरी आपल्या बैलांची विशेष काळजी घेतात . वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांचा सन्मान व्हावा यासाठी या गावात गेल्या ९० वर्षा पासून राजा सर्जा महोत्सव साजरा केला जातो . या वर्षी अद्याप पाऊस झाला नसतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेती व्यावसायाला साथ देणाऱ्या मुक्या पशुधनांचा बोलका म्होत्सव उत्साहात साजरा केला
बैलजोड्याना सजवून गावातून ढोल , तासे , बँड , हलगी , डॉलबीच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती . यावेळी मल्लानी चित्तथरारक मलखांबाची प्रात्यक्षिके करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . शेतकऱ्यानी डॉलबीच्या विविध गाण्यांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला होता . गावातील तरुण मल्लानी मलखांबा वरील चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली . प्रात्यक्षिके पहाण्यासाठी महिलांची विशेष उपस्थिती होती .
महोत्सवात शेकडो देखण्या बैलजोड्यांचा सहभाग होता . सकाळी बैलजोड्यांची पुजा करून बैलाना पुरण पोळी खाव् घालण्यात आली . संपुर्ण गावातील महीलानी बैलजोड्यांची ओवाळणी केली . घराघरांच्या छतावरून महिला वर्गानी या महोत्सवाचा आनंद लुटला . मुरूम , आळंगा , कोथळी , भुसणी , कसगी , औराद , कंटेकूर , आदि सह परिसरातील शेकडो गावाच्या शेतकऱ्यानी आपला सहभाग नोंदविला होता . संपूर्ण गाव दिवसभर या राजा सर्जाच्या महोत्सवात आनंदाने सहभागी झाले होते .
एका बाजूला सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कर्ज काढून शेतकऱ्यानी मुक्या राजा - सर्जाचा बळीराजा म्होत्सव उत्साहात साजरा केला .म्होत्सव यशस्वी करण्यासाठी सुनिल पाटील . सचिन पाटील , शंकर काजळे , धर्मराज जाधव , प्रकाश जाधव , अमोल गायकवाड आदी सह ग्रामस्थानी म्होत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
