उस्मानाबाद/प्रतिनिधी:- भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ घेणेबाबत तसेच भारत निवडणूक आयोगास सादर करणेबाबतची बैठक दि.18 जून रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी सर्व उमेदवार खर्च प्रतिनिधींनीही उपस्थित राहणे आवश्यक आहे, तसेच मतदारसंघातील निरीक्षक खर्च नियंत्रण कक्षातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील या बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.या बैठकीमध्ये राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी खर्चासंबधीच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उमेदवारनिहाय ठेवण्यात आलेल्या खर्चाच्या लेखांचा ताळमेळ घेण्यात येवून अंतिम लेखे भारत निवडणूक आयोगास सादर करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
या बैठकीस निवडणूक निरीक्षक (खर्च नियंत्रण) पी. सुधाकर नाईक, नोडल ऑफिसर (खर्च नियंत्रण कक्ष) श्री. शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर (खर्च नियंत्रण कक्ष) श्री. किरण घोटकर व इतर अधिकारी /कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नोडल ऑफिसर (खर्च नियंत्रण कक्ष)  40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ श्री. शेखर शेटे यांनी दिली आहे. 
 
Top