प्रतिनिधी/प्रतिनिधी
उस्मानाबादसाठी नविन वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा गिरीष महाजन यांनी उस्मानाबाद मधील भव्य आरोग्य शिबीरामध्ये घोषीत केले होते. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत भाजपाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी सभागृहात हा प्रश्न पोटतिडकी ने मांडला होता. त्याही वेळेस वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी उस्मानाबाद मध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू होईल यांचे आश्वासन दिले होते. परंतू नुकतेच सात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही. नव्याने मंत्रीमंडळात सहभागी झालेले ना.प्रा. तानाजी सावंत यांनी सुजितसिंह ठाकूर यांच्या मदतीने जोर लावावा, अशी मागणी केली जात आहे.
उस्मानाबाद मध्ये वैद्यकीय महाविद्यालय चालु करण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या लगतची जि.प.कन्या प्रशालेची १० एकर जागा, वर्ग करण्यात आली. शासकीय रूग्णालयाच्या नवीन सुसज्ज ईमारती उभा राहिल्या परंतू नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेची अंमलबजावणी मात्र झाली नाही. केंद्राकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 7 नवी वैद्यकीय महाविद्यालये होणार असून एकूण 3,670 जागाही वाढणार आहेत. यात नाशिक, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा, परभणी, अमरावती, बुलडाणा येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयांतर्गत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे परभणीच्या अगोदर वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात उस्मानाबादरांची मागणी होती.
महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारकडे एमबीबीएसच्या जागा वाढवणे, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळण्यासह विविध मागण्यांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची 15 जून रोजी दिल्ली येथे भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. डॉ. हर्षवर्धन यांनी त्यास तत्काळ मंजुरी देत परिपत्रक काढले. राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. एमबीबीएसच्या जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण करावी लागायची.