उस्मानाबाद /प्रतिनिधी- शहरात शेख साबेक मेहबूब दौला (रा. खॉजा नगर उस्मानाबाद) हे कुटुंबीयांसह बहिणीकडे बोरीवली मुंबई येथे ईदनिमित्त गेले होते.
यावेळी रहीम शेख व त्याची पत्नी (दोघे रा. मोहा ता. कळंब) यांनी शेजारच्या स्लॅबच्या खोलीवरून पत्र्याच्या सांधीमधून शेख साबेक मेहबूब दौला यांच्या घरात घुसून कपाटातील ७ तोळे १० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत २,४०,०००) व रोख ७० हजार रुपये असा तीन लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेख साबेक महेबुब दौला यांच्या फिर्यादीवरून रहीम शेख व त्याच्या पत्नीविरुध्द गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. |