प्रतिनिधी/उस्मानाबाद-तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहेत. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे चालविले जाते.
गोरगरीब हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे, या हेतूने हे महाविद्यालय ३५ वर्षांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी महाविद्यालयाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाने शासन सवलतींव्यतिरिक्त मंदिरातर्फे स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स व केमिस्ट्री या ३ विषयांच्या सीईटीमधील गुणांच्या बेरजेप्रमाणे ३० ते ४० टक्के गुण घेणाऱ्यांना २५ टक्के सवलत, ४०.१ ते ५० टक्के ५० टक्के, ५०.१ ते ६० टक्के गुण घेणाऱ्यांना ७५ टक्के तर ६०.१ च्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० शुल्कामध्ये टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मुलींसाठी प्रथम वर्षासाठी मोफत वसतिगृह सुविधा देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. |