प्रतिनिधी / तुळजापूर -शहरात परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (दि. १९) ९ बटूंचा सामूहिक उपनयन सोहळा उत्साहात पार पडला. भावसार धर्मशाळेत आयोजित मंगलमय वातावरणात उपनयन सोहळा पार पडला. यावेळी संकेश्वर बेळगाव येथील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती यांनी बटूस शुभ आशीर्वाद दिले. यावेळी हैदराबाद येथील भागवताचाय॔ भाऊ महाराज निटूरकर, ऋषिकेश दादेगावकर, बंडू पाठक, नागेश अंबुलगे, निल्लोत्तम जेवळीकर, पार्थ गोडसे (नाशिक), गणेश अंबुलगे, किरण पाठक आदी पुरोहितांनी वेदपठण केले. यावेळी तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य नागेश नाईक, विकास मलबा, नगरसेविका अप॔णा नाईक, अंकुर नाईक, सुनील रोचकरी, भालचंद्र पाठक, रवी पाठक, तुळजाभवानी उपाध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक शामराज, अॅड जगदीश कुलकर्णी, अरविंद अपसिंगेकर, बाळासाहेब दीक्षित, राजू प्रयाग, गुलचंद व्यवहारे, विशाल रोचकरी, जयंत कांबळे, किशोर कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रावसाहेब कुलकर्णी, विनायक कांबळे, रोटरीच्या पदाधिकारी अनुराधा नाईक, सुरेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. या उपनयन संस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गणेश अंबुलगे, किरण पाठक, राम अंबुलगे, परेश व्यास,पुरंजन कोंडो, संदीप जोशी, विजय पाठक, रेणूकदास पाठक, प्रतीक प्रयाग,
प्रसाद प्रयाग, निखील कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, आदित्य हिरळकर, श्रीधर काटकर, गिरीराज लसने, कमलेश देशपांडे, अथर्व पाटील, पराग कुलकर्णी, ओम कुलकर्णी, सार्थक कुलकर्णी, कृष्णा अंबुलगे, स्वप्नील पाठक, योगेश पाठक, संतोष दुनाखे, जिओत्तम जेवळीकर, निलोत्तम जेवळीकर, सर्वोत्तम जेवळीकर यांनी पुढाकार घेतला.