उस्मानाबाद/प्रतिनिधी - भारतिय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहूल गांधी जी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस विधी, मानवी हक्क व आर.टी.आय. विभागा कडूण उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रुग्ण मातांना , बालकांना व नवशिशुना फळे वाटप करूण काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहूल गांधी जी यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला, आणि राहुल गांधीजी यांच्या आरोग्य व दिर्घायुश्यासाठी प्रार्थना करूण शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या विधि विभागाचे प्रदेश सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत शिंदे, आर.टि.आय. विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहित थिटे,  विधि विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष अॅड. राहूल लोखंडे, जिल्हा संघटक सचिव अॅड. अमोल कुरूंद, तालुकाध्यक्ष अॅड. मोईन शेख, जिल्हा सरचिटणीस अॅड. रत्नदिप सोनवणे, महेश करवर, अशोक वैध्य, महेश गरड, अविनाश बेलदार, निचळ योगेश, सागर वरकाटे, रामेश्वर चव्हाण, तानाजी यमगर, फिरोज पटेल, प्रविण यमगर, अतुल करवर, आकाश ओव्हाळ, शिवकांत मंडोळे, संदिप थोरात इत्यादि उपस्थित होते.
 
Top