परंडा/ प्रतिनिधी : - येथील शिक्षणमहर्षी गुरूवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात दि.१९ बुधवार रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होते. तर व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमूख प्रा डॉ.शहाजी. चंदनशिवे, अर्थशास्त्र विभागप्रमूख प्रा. डॉ अरुण खर्डे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.एच.एम. गायकवाड,प्रा.डॉ.सचिन चव्हान, प्रा.डॉ.गजेंद्र रंदील आदी उपस्थित होते. 
लोकांना वाचनाची सवय व्हावी या उद्देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ राज्याच्या धर्तीवर तसेच कै.पी.एन.पनिकर यांच्या स्मरनार्थ पनिकर फौंडेशन मार्फत जून महिण्यात एक आठवडा रिडिंग वीक म्हणुन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर मा.सहसंचालक उच्च शिक्षण औरंगाबाद विभाग , औरंगाबाद यांच्या दिनांक १७ जून २०१९च्या संदर्भीय पत्रानुसार महाविद्यालयात वाचन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.सचिन चव्हान,प्रा.डॉ.एच.एम.गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या कि वाचनाने मानसाचे जीवन बदलते. समाजातील, देशातील अनेक घडामोडी केवळ वाचनामूळे समजतात, विद्यार्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. कार्यक्रमाचे आयोजन , सुत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. 
      यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी सभागृहामध्ये वाचन केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.जगन्नाथ माळी, प्रा.दिपक तोडकरी ,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.तानाजी फरतडे यांनी केले.
 
Top