उस्मानाबाद,/प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचने च्या अनुषंगाने उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवांराच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेखाचा ताळमेळ घेणेबाबत तसेच अंतिम लेखा  भारत निवडणूक आयोगास सादर करण्याबाबत बैठक आज दि. 18 जून  रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाली. या बैठकीसाठी सर्व उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 या बैठकीमध्ये राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी खर्च संबंधीच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उमेदवारनिहाय ठेवण्यात आलेल्या खर्चाचे लेखे सादर करण्यात आले. व अंतिम लेखे भारत निवडणूक आयोगास सादर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही  करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.
 या बैठकीस  निवडणूक निरीक्षक खर्च नियंत्रक सुधाकर नाईक, खर्च नियंत्रण कक्ष नोडल ऑफिसर श्री. शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर खर्च नियंत्रण कक्ष श्री. किरण घोटकर, संपर्क अधिकारी श्री.सचिन कवठे, सर्व सहाय्यक निवडणूक निरीक्षक , इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
Top