प्रतिनिधी/ उस्मानाबाद-फुटपाथवर व्यापाऱ्यांनी हातगाडे लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन गाळेधारकांची तसेच पादचाऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याने मंगळवारी वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोर्टापर्यंतची अतिक्रमणे काढून यापुढे अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची समज दिली. 
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोर्टापर्यंचा फुटपाथ हातगाड्यांनी गिळंकृत केला आहे. यामुळे बसस्थानक, चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यामुळे वाहतूक पोलिस शाखा व पालिकेने संयुक्तरित्या अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. दिवसेंदिवस हातगाडेवाल्यांकडून पूर्ण रस्ताच गिळंकृत केला जात आहे. याचा वाहतूक कोंडीवर परिणाम होत होत आहे. यामुळे मंगळवारी शहर वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोर्टापर्यंतच्या फुटपाथवरील हातगाडे व व्यापाऱ्यांची दुकाने काढली. तसेच यापूढे फुटपाथवर गाडा किंवा दुकान मांडल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची समज वाहतूक पोलिसांनी दिली आहे. यानंतर शहरातील इतर भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. अतिक्रमण काढण्याच्या कामासाठी वाहतूक शाखेचे १२ तर पालिकेचे सहा कर्मचारी व एक ट्रॅक्टर होते. 



 
Top