तुळजापूर तालुक्यातील खंडाळा गावाला बुधवारी (दि. १५) सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी दुष्काळी परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
जिल्हाधिकारी मुंडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांंर्गत खंडाळा गावास भेट देऊन झालेल्या कामांची पाहणी केली. आण्णा बळीराम पवार याचे शेततळे अस्तरीकरण, द्राक्ष बाग, सुधाकर चंदू पांडगळे यांची मनरेगाअंतर्गत आंबा फळबाग, तसेच वैयक्तिक लाभार्थी मोटार तुषार संच, पाईपलाईन धारक लाभार्थींना विचारपूस केली. यावेळी सरपंच भीमराव लोखंडे, उपसरपंच दैवशाला पवार, रेखा पवार, सुमन जाधव, नितीन ढवण, गणेश पवार, महालिंग कुंभार, ग्रामसेवक ए. जी. भंडे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी संजय जाधव, कृषी सहाय्यक एन. पी. अलमले, अनिल पवार, विठ्ठल सूर्यवंशी, समुह सहाय्यक रुपनर व साठे आदींसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उपस्थिती होते.
|
