भूम/प्रतिनिधी-
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या बी.ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात मंगळवारपासून (दिनांक 14) सुरू होत आहेत.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्फत विविध अभ्यासक्रम कार्यरत आहेत त्यापैकी बी ए मराठी, हिंदी, इंग्रजी अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ता 14 मे ते 2 जून 2019 या कालावधीत विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ चंदनशिव एस बी केंद्र संयोजक प्रा डॉ शिंदे डी व्ही सहाय्यक प्रा रमण मिसाळ यांनी केले आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक सूचना फलकावर लावण्यात आले आहे, संबंधित विद्यार्थ्यांनी हॉलतिकीत मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून आपला पी आर एन क्रमांक टाकून प्राप्त करून घ्यावेत व विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेस उपस्थित राहावे असे प्राचार्य आणि केंद्र संयोजक यांनी कळविले आहे.
 
Top