मुंबई / वृत्तसंस्था-
 दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या 21मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वातानुकूलित थंडगार हवेत कामकाज पाहणारे अधिकारी आता भर उन्हात बांधावर पाहायला मिळणार आहेत.
तर अनेक सनदी अधिकार्यांचे कुटुंबासमवेतचे उन्हाळी सुट्टीचे
बेत लांबणीवर पडले आहेत. राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
त्याचाच भाग म्हणून आता पालक सचिवांचे दौरे होणार आहेत.
पालक सचिवांच्या दौरामुळे भिषण दुष्काळाशी सामना करण्यार्यासाठी कितीसा फरक पडणार हे येणार्या काही दिवसांत कळेल .
 
Top