प्रतिनिधी/ भूम-
दुष्काळ सर्वत्र हाहाकार करीत असून याचा मोठया प्रमाणात मानवा‘या शारीरिक व मानसिकतेवर होत असताना रुग्णांना दिलासा व योग्य उपचार साठी जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक व् शैक्षणिक संस्था व मोरे हॉस्पीटल येथे आयोजित केलेल्या होमिओपथिक शिबिर पार पाडले.
या शिबिरासाठी उत्तम प्रतिसाद लाभला त्यामधे 1&& रुग्णांनी उपचार शिबिराचा लाभ घेतला . त्यासाठी तज्ञ डॉ संजय पाटील ,डॉ  प्रताप पाटील (कोल्हापूर) ,डॉ सिकंदर पठाण ,डॉ शीतल बने , डॉ .ओंकार कोरे ,डॉ .प्रदिप मोरे ह्यांचे मार्गदर्शन लाभले . होमिओपथिक औषधोपचारांचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ घेउन आजारमुक्त व्हावे ह्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे संस्थे‘या अध्यक्षा डॉ .शारदा मोरे ह्यांनी सांगितले
 
Top