लोहारा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे शिवजयंती निम्मीत भरवण्यात आलेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल किक्रेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे संविधान बचाव परिषदे अध्यक्ष अशोकराजे सरवदे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र चव्हाण होते. तर प्रमुख म्हणुन जनार्धन आष्टे, लहुजी शक्ती सेनेचे दिपक रोडगे, वाघंबर बलसुरकर, संजय बिराजदार, गोकुळदाजी चिकुंद्रे, रावसाहेब मुगळे, देवराज भुरे, अदि उपस्थित होते.
या स्पर्धेत 65 संघानी सहभाग घेतला होता. या भव्य खुल्या टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत प्रथम बक्षीस कानेगाव येथील संघाने 21555 रु व द्वितीय बक्षीस नारंगवाडी येथील शिवशाही किक्रेट क्लब याने 15555 रु तर तुतीय बक्षीस जेवळी येथील संघाने 5555 रु पटकाविले. या विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. व व्ययक्तीक 15 बक्षीस देण्यात आले. क
ार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अमोल पवार, दादा चिकुंद्रे, शंकर पांचाळ,  विकीन सांगवे, आकाश पवार, निलेश पवार, सम्राट पवार, संभाजी लोहार, प्रविण राजपुत, संजय पवार, दता पांचाळ, अदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन गणेश पवार यांनी केले तर आभार विठ्ठल चिकुंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top