भूम/प्रतिनिधी-
दुष्काळाची झळा केळी उत्पादन
शेतकऱ्यांना पोळू लागली असल्याचे चित्र भूम तालुका परिसरात दिसू लागली असून टँकरने पाणी देऊनही पीक हातचे गेले आहेत. या गंभीर बाबीकडे संबंधित महसूल व कृषी अधिकारी यांनि पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत।
भूम येथील शेतकरी फारुख याकूब बेग यांच्या केळी बागेचे नुकसान पाहता इतर केळी उत्पादन शेतकऱ्यांचे हाल न सांगणे बरे ।फारुख बेग यांनी 29 मे 2018 साली 1 एकर 10 गुंठे बागायती जमीन कसून 1800 खुंट 6*5 वर लागवड केली होती याला मे 2019 मध्ये वर्ष पूर्ण होऊन फळ मोठया प्रमाणात आल्याने एकंदरित पूर्ण खर्च 1 लाख रु आला होता.
त्यांनी दुष्काळावर मात करण्याच्या हेतूने आपल्या घरच्या बोर मधून टँकरने पाणी शेतातील विहरीत सोडत होते तरी पण त्यांना यश आले नाही दुष्काळाची एवढी तीव्रता हाती की अक्षरशः केळी ची झाडे सुकून गेले आहेत।
पाणी टँकर द्वारे मार्च 20 पासून दररोज 5 खेप 6000 लिटर ते अध्यप पाणी देणे चालू असून दररोज 2000₹ प्रमाणे खर्च करूनही फळ आपल्या पदरात पडणार नाही म्हणून शासन दरबारी हेलपाटे मारले असता अध्यप या बाबत आम्हाला आदेश दिले नाहीत असे उत्तर त्यांना ऐकावयास मिळाले असल्याने अखेर या गंभीर बाबीकडे सरकार कितपत लक्ष घालणार हे पाहावयास मिळते का? हे काही दिवसात दिसेल.
