काटी/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. ( 5 ) रोजी रात्री 11 ते 1:30 वाजनेच्या दरम्यान येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मधील चंद्रकांत शंकर गाजरे यांच्या घराची घरफोडी करून रोको रक्कमेसह सत्तर हजाराचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, येथील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणारे चंद्रकांत शंकर गाजरे व त्याचे कुटुंबीय गावात भारुडाचा कार्यक्रम पहाण्यासाठी गावात आले असताना घरात कोणी नाही याची संधी साधून चोरटय़ांनी रोक रक्कम 25000/_ व 45000 हजाराचे सोन्याचे दागिने असा एकूण सत्तर हजाराचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थामधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी डाॅग स्काॅड पथक व फिंगर प्रिन्ट पथकाने घटनेची पहाणी केली.
समाधान चंद्रकांत गाजरे यांच्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात कलम 457, 380 भादंवि नुसार अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार एच.सी. टकले करीत आहेत.